स्त्री

आहे एक स्त्री मी,
का अधिकार नाहीत मानवाचे
वापर करतात सगळेच माझा,
कसे टिकवू अस्तित्व वास्तल्याचे…
सावित्रीची लेक मी,
जरी मिळाले स्वातंत्र्य शिक्षणाचे
तरी दुर्गम भागात अजूनही बसलेय,
शिकत धडे बाल-संसाराचे…
सगळे निर्बंध माझ्यावर लादतात,
जणू बाहुले मी त्यांच्या हातातले
चुका करूनही पुरुषच महान
असे रीवाज आपल्या संस्कृतीचे…
कधी जगावे वाटले आजच्या युगात,
सगळे तोडून बंधन रिती-रीवाजाचे
पोरी बिघडल्या, पोरी बिघडल्या
असे ब्रीद वाक्य या समाजाचे
नाजूक असे ती बाहुली,
करी मागणे थोड्याशा प्रेमाचे
पण घरातूनच तर दूजाभाव मिळे,
म्हणून शोधी प्रेम ती बाहेरचे…
कोणी नाही समजतं आम्हा,
का बिघडले वागणे मुलींचे
क्रूरतेने तूमच्याच तर,
होई उद्रेक मनातील भावनांचे