“नटखट स्वरा “
इवल्याश्या पावलांनी तू घरी आली,
तुझ्या पावलांनी जशी लक्ष्मीच घरी आली.
निरागस डोळ्यांनी तू मला बघीतले,
तुला बघताच डोळे माझे भरून आले…
मी स्वप्न बघीतले ते आज पुर्न झाले,
घर असे आमचे वृंदावन झाले.
तुला बघताच सगळे आनंदी झाले,
सर्वांनी हया नटखट चे नाव स्वरा ठेवले…
भातुकली चे खेळ खेळणारी स्वरा,
आता मोबाइल वर आली.
जेवणाची सुरवात तिची,
आता यूट्यूब ने झाली…
स्कूल मधे जाताना,
नखरे तिचे भारी.
चॉकलेट तिला दाखवताच,
लवकर करते ती तयारी…
ब्लॅक मेलीन तिला आता,
खुप करता येते.
मम्मी पप्पा नाही तर,
दादीला मस्का मारते…
पण स्कूल मधे स्वराची,
कोणीच नाही करत बरोबरी.
म्हणूनच आहे ती,
पूर्ण स्कूलची झासी ची राणी…
नटखट खोडकर आहे पण,
परी आहे माझी ती.
उदंड आयुष्य लाभो तुला,
अशी प्राथना करतो देवाला आम्ही…