तळहातावर दिप तेवते

तळहातावर दिप तेवते
घेऊनी शपथ जनकल्यानाची
सदैव आम्ही गरिबांचेच आहोत
हीच सदिच्छा आम्हां सभासदांची
नाही कोणता हव्यास आम्हां
नाही कोणती प्राप्ती
आम्हांस करावयाची सेवा गरीबांची
यातच आमची मनशांती
भूकेलेल्यांना अन्न द्यावे
वस्त्रहीनांना कपडे
हिच सेवा आम्ही करू इच्छितो
शिकवूनी जनकल्यानाचे धडे
मराठमोळी माणसे आम्हीं
ना आम्हां कसला अभिमान
लाज नाही या कामाची
नाही करीत कसला अवमान
छोट्याशा या विचारांचा
विशाल मोठा सागर व्हावा.
सेवा बनूनी मीट समान
उद्धार व्हावा गरीबांचा
आदी कर्तव्य एकची व्हावे
सेवा हेच धन मानावे
करूनी वंदन गणरायासमवे
कार्य हे आमुचे सार्थकी लागावे