शाळेचा कट्टा (२०१०-१५)

पोरा पोरींच आमचं नेहमीच वाकड असायचं
एकाच वर्गात शिकलो पण कधीच नाही पटायचं
पाचवी पासून दहावी पर्यंत माहीत नाही कस निभावलं
Opposite Gender कट्टर दुश्मन
पण अजूनही आम्ही टीकवल
खोड्या तर आमच्या विचारू नका
जेसीबी च्या दातात बसून मिरवल
वातुंड्याची गँग लय लय खोडकर
जणू हे किताबच आम्ही मिळवल
पहिल्या सुट्टीत डबा तर दुसऱ्या सुट्टीत मेकप
झोप तोंडावर दिसू नये म्हणून करायचो तिचा पॅकप
बिराजदार तर सगळ्या सरांचा होता लाडका
उभा चैत्या त्यासोबत सारखा
कुण्याची तर नेहमी वाकडीच असे वाट
सरळ जरी बोललं तरी बोलायचा नेहमी ताठ
अभ्यास पण होता तेवढा मस्ती पण तेवढी
एका मागून एक टॉपरची रांगच होती केवढी
सहा जणींच्या जोड्या तर ठरलेल्याच होत्या
मी त्यात सातवी कोणाच्या अध्यात ना मध्यात
बाकीच्यांच गोटम्याट तर वेगळच होत ठरलेलं
आंदगाव, खारवडे,वातुंडे ग्रुप तर आम्हीच होत नेमलेल
आता आहेत कोणी कुठं ?पण मेळ सगळ्यांचा होत नाही
शाळेचा कट्टा आमचा पुन्हा कधीच भरत नाही