कॅम्प च्या आठवणी (२०१९)

सकाळी उठायची व्हायची धावपळ
केदारी व्हायचा लेट
दिव्या आमची चिडायची
मॅम आमचा लीडरच बदला थेट
एकही अस नव्हत की ज्याचं केदारिशी पटायचं
एक तर नमुना असा की ज्याला हसायला नाही कधी यायचं
रोजचा नवीन टास्क,रोजची नवीन कथा
एक यायचं वेळेवर तर दुसऱ्याला शोधत बसा
कोणाचं असे जेवण, तर कोणाचा असे खेळ
अवती भोवती सगळे पण कोणाशी बोलायला नसे वेळ
डान्स ने तर वैभव च्या कमालच केली होती
आई शप्पथ तुझ्यावर च्या गाण्याने
सर्वांची झोपच उडवली होती
गोळे-पवळे पाटलांचा तर रुबाबच वेगळा होता
पवार साहेब तर शिवारात मागूनच आला होता
मेघा आणि प्रियांकाची तर जोडीच होती ठरलेली
कॅम्प ही एकमेव आठवण
जी मी शितल शिवाय अनुभवलेली
संदीप ची हिंदी तर लय लय द्वाड
बोललेल समजतय पण बोलायलाच येत नाय
रॉक तर केदरीचा अजूनही मला आठवतोय
आठवता आठवता गालावर हसू खुदकन उमटतय
(हम होंगे कामयाब,हम होंगे कामयाब
हम होंगे कामयाब एक दिन)