✍️प्रेम खेळ नाही बाहुल्यांचा✍️
✍️प्रेम खेळ नाही बाहुल्यांचा✍️
————————————————//
नभं पांघरून आभास होवु दे गर्द सावल्यांचा…
तप्त उन्हात उगाच भास तुझ्या चोरपावलांचा…
मिठित हरपली रात्र तुझ्या मखमली स्वप्नाची
हा अलगुज वारा साद घाली तुझ्या चाहुलाची
नकळत मोहरून आला बहर तुझ्या प्रीतिचा
स्वप्न तुझेच फुलारते नयनी तू श्वास चैतन्याचा
नभं पांघरून आभास होवु दे गर्द सावल्यांचा…
गरजुन आले मेघ एकाकी वर्षाव मंद तुषारांचा
बरसल्या सरी कातरवेळी तुझ्या आठवणींच्या
का व्याकुळ हृदयाला आभास तुझ्या स्पंदनाचा
नाचतो मनात मोर फुलवुन पिसारा आनंदाचा
नभं पांघरून आभास होवु दे गर्द सावल्यांचा…
रात चांदण्याची कुस बदलत कोरडीच पहाटली
हुर हुर ह्या जिवाला तुझीच कशी रे घोर दाटली
हा रेशिम धागा तुझ्या प्रेमविश्वात गुंफतो का असा
उमजले रे मला खरे प्रेम नाही खेळ बाहुल्यांचा
नभं पांघरून आभास होवु दे गर्द सावल्यांचा…
————————————————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
09/05/2022