जिनवानी स्तुती (अभंग )
वीतराग वाणी, धोय मिथ्यात्वाला,
जाशिल मोक्षाला, ऐक जीवा ||1||
कर्म बंधा तोडी, सुखाचा खजाना,
अध्यात्माची वीणा, सुखदाई ||2||
खान सप्त तत्व, पाप पुंण्या जाण ,
हिताहिताचा वाण, वीर वाणी ||3||
अद्वितीय तेज, अनेकांत छान,
अकलंक न्याय, जोड नाही ||4||
भाद्रता समंता, वाजवीला डंका,
मिथ्यात्वाची लंका, देशोदेशी ||5||
कर्मकांडी जोर, हिंसेचा तांडव,
अज्ञानी मांडव, संपवीला ||6||
आनंदाची खान, सुखाचे सागर,
चैतन्या आगर, दुजा कोण ||7||
वीतराग ज्ञान, इंद्रिय उदास,
दुर्गतीचा ह्रास, होय आता ||8||
सांगे जिनवाणी, दास इंद्रियचा,
आस परिग्रहा, ठेऊ नये ||9||
जननी वैराग्य, अमृत आत्म्याचे,
निर्वाण दुःखाचे,’अजेय’ ता||10||