✍️ते मोगऱ्याचे झाड होते✍️
✍️ते मोगऱ्याचे झाड होते✍️
……………………………………………………//
तिच्या आठवणीचे तसे न फार वेड होते
दाटलेले अंतःकरण आज फार जड होते
कसे पाझरले काळीज दगडाच्या उरात
पाऊलांना अंथरुण जरासे आखुड होते
उसंत वेदनेला जरा का मिळाली तिच्या
मुखी हास्य अन अश्रु पापणी आड होते
पाऊसांच्या चिखल वाटेत मंद हा गारवा
चिंब भिजलेले कैफ़ ओठ तिचे गोड होते
लाजत मुरडत आषाढीच्या सरीत भेटली
ती फुलली बहरली ते मोगऱ्याचे झाड होते
……………………………………………………..…//
✍️”अशांत”शेखर✍️
11/07/2022