“माझ्या त्या भावना”
बघशिल जेव्हा माझ्या भावना,
कळेल तेव्हा तुला.
प्रेमा शिवाय काहीच नाही,
माझ्या त्या भावना…
तुला द्यायला माझ्या जवळ,
असे काहीच नाही.
पण माझ्या प्रेमा शिवाय,
हया जगात अनमोल काहीच नाही…
खुप काही मिळेल तुला,
माझ्या व्यतिरिक्त.
क्षणिक सुख ते असेल,
कारण तिथे मी नसेल…
तुझी जी अपेक्षा आहेत,
तितका मी सुंदर नाही.
पण सुंदरता तर,एक मुखवटा आहेत,
तो माझ्या जवळ नाही…
तुझ्या साठी चंद्र,तारे आणील,
असे मी नाही बोलिल.
जे कधी शक्यच नाही,
असे खोटे मी,तुझ्या सोबत बोलणार नाही…
एक सांगतो तुला मी आज,
तुला खूष ठेवण्याचे,प्रयत्न सगळे करील.
आयुष्यभर तुला,प्रेम करीत राहिल,
आणि आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून,
मी इथेच ताज महल तुझ्या साठी बनविल…