कॉफी..!
तो कॉफीचा कप आज पुन्हा आठवल,
घाबरत स्वतःला सावरलेलं,
तुझ्यासोबत गप्पा मारत थोडं मन बावरलेल..!
तू दिलेले सगळे चॉकलेट्स पुन्हा आठवले,
जेव्हा त्यांचे कव्हर्स मी माझ्या बॅगमध्ये पाहिले,
स्वतःची स्माईल कंट्रोल करत मी जरा शांतच राहीले…!
तुझी प्रत्येक हाक जेव्हा माझ्यापर्यंत आली,
मी स्वतःला विसरून तुलाच पाहत राहिली,
आज परत मला तुझ्या काळजी घेणाऱ्या डोळ्याची आठवण झाली..!
मला आपली आज पहिली भेट आठवली,
जी कधीच ना मी ना तू विसरलीस,
अनिता कॉफीच्या कप सोबत मी तुझीच झाली..!!