Sahityapedia
Sign in
Home
Your Posts
QuoteWriter
Account
7 Feb 2022 · 1 min read

आशा

जगाकडे सुखावून पाहायला लावणारी…
आणि स्वतःला समाधान देणारी..
वाट चुकल्यानंतर स्वतःला सावरणारी..
नि प्रत्येक क्षणाला मनाची ढाल बनणारी..

हीच असते आशा नि त्या आशेची किरणे!!

दुःखातही सुखाचा पाझर बनणारी..
नि सगळ्या अडचणींना निडर असणारी..
धास्तावलेल्या मनाला शांती देणारी..
काट्यातही गुलाबाचे फुल म्हणून उगवणारी..

हीच असते आशा आणि त्या आशेची किरणे!!

जिद्दीने प्रत्येक उमेद टिकवणारी..
नि आपलं आयुष्य पुन्हा सावरणारी..
क्षण बदलत असतानाही, ओठांवर स्मित खुलवणारी…

हीच असते आशा आणि त्या आशेची किरणे!!

Loading...