✍️जगात कोटि कोटिचा मान असते✍️
✍️जगात कोटि कोटिचा मान असते✍️
………………………………………………//
धेय्याकड़े सरसावणाऱ्या
एक एक पावलांना वाटेची
हाक दमदार असते…
काळोखात लुकलुकणाऱ्या
मंद मंद तारकांना सूर्याची
साथ दिलदार असते…
उत्तुंग स्वप्न पेलणाऱ्या
प्रत्येक हातात सामर्थ्याचे
जन्मजात बळ असते…
संघर्षाची दुःखे झेलणाऱ्या
प्रत्येक काळजात वेदनेची
असहय कळ असते…
व्यवस्थेचे हलाहल पचवनाऱ्या
एका महामानवाला
त्याच मातीशी ईमान असते…
सत्तेचे ऐश्वर्य भोगणाऱ्या
इथल्या माथेफिरूंचे जमीर
संविधानालाच बेईमान असते…
इथे जाती आड छळणाऱ्या
समाजकंटकांना थोर
म्हणुनी इतिहासात स्थान असते…
देशाचे भाग्य लिहिनाऱ्या
क्रांतिसूर्याच्या लेखनीला
जगात कोटि कोटिचा मान असते…
………………………………………………//
✍️”अशांत”शेखर✍️
03/07/2022