✍️स्त्रोत✍️
✍️✍️स्त्रोत✍️✍️
————————-//
भर तारुण्यात
राजप्रसादाच्या मखमली
बिछ्यान्यावर सूंदर परिकन्यांच्या
विळख्यात लोळण घालण्याचे
तू नाकारलेस…
आणि धिक्कार केला निसर्गदत्त पाण्याच्या
देणगीवर हक्क सांगणाऱ्यांचा…
पाण्यासाठी माणसांचे युद्ध नको
म्हणून तुझ्या प्रजासत्ताक व्यवस्थे विरुद्ध बंड
करणारा तुच…
पृथ्वीतलावर पहिल्या जलक्रांतिचे
बिज पेरणारा तुच…
पण माणसांचा रक्तपात टाळन्याचे
मोठे पातक तुझ्या हातुन घडले
आणि तु राजद्रोही ठरलास…
त्यांच्या शिक्षा अगदी सहजतेने मान्य करून
स्विकारल्यास तू पथिक बनुन
परिव्रज्याच्या वाटा…
राजविलासी सुखसुविधा त्यागुन
निघुन गेलास कुठलीही हुजरतक्रार न करता…
मानवी वेदनेच्या शोधात…
मात्र तुझ्या जलक्रांतिचा स्त्रोत
झिरपत राहिला अंश अंश
चवदार तळ्याच्या पाटावर…
अन तू पेरलेल्या बिजातून उभा
राहिला महाकाय क्रांतिवृक्ष
चवदार तळ्याच्या काठावर…
——————————————//
✍️”अशांत”शेखर✍️
07/05/2022