✍️टिकमार्क✍️
✍️टिकमार्क✍️
——————//
चार नाही तर
कमीत कमी
दोन सूचक पर्याय
असतातचं…!
योग्य टिकमार्क
करण्याची निवड
चुकली की सार कसं
चुकत जातं….
आयुष्याच अगदी
तसचं असतं…
चांगल की वाईट
सत्य की असत्य
योग्य की अयोग्य
सज्जन की दुर्जन
अनुकूल की प्रतिकूल
ईमान की बेईमान
आपलं की परकं..
जीवनाच्या वस्तुनिष्ठ
उत्तर पत्रिकेचे योग्य
पर्याय टिकमार्क
करायचे असतात…!
अन्यथा आपण
कुणासाठीच पर्याय नसतो
टिकमार्क करण्यासाठी….!
———————————–//
✍️”अशांत”शेखर✍️
23/05/2022