✍️आव्हान✍️
✍️आव्हान✍️
———————————–//
माझ्या फुटलेल्या
एका बुबुळात
सूर्य जळतो आहे
प्रकाशाचा वेध घेण्यासाठी…
युगतमाचा पात्र होण्याचे नाकारले मी…
वाऱ्यांनी कितीही
कट केला
माझ्या विरुद्ध दिशेने घोंगावन्याचा…
वादळाचा वंशज होण्याचे स्विकारले मी…
डोळ्याला डोळे भिडवुनच
भिडायचे असते युद्धभूमीवर..
हारजीत ती वेळकाळ ठरवणार
आता म्यानातील तलवारीला पर्जवले मी…
उभे शरीर जखमाळले
शापाचे बाण घेवुन उरी…
वेदना हि वेदनाहीन झाल्या
जेव्हा काळ टाक्यांचे घाव सोसले मी…
————————————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
13/05/2022