आदित्य निसर्ग
लाल गादी वरती
मऊ घनाची उशी,
पहा रे आदित्य
घेतोय शांत झोपी;
सोनेरी रेषेची चादर
त्याने ओढी घातली,
उठ रे आदित्य
चादर धरणीवर आली;
काळ्या दरी वरती
शुभ्र धुवारी फुले,
ये रे आदित्य
ठेव तुझी पावले;
गवताच्या पानावर
दवाची बुंदोरी,
ये रे आदित्य
भर रंगाची सरी;
डोके अलगद फुले उचलती
तुझ्या स्वागतासाठी,
ये रे आदित्य
दे त्यांना भेटी.