श्रावण मास आणि वर्षा
मातीचा गंध जागवित श्रावणधारा येती,
असते हिरवळ चोहीकडे आनंदाचे बगीचे फुलती.
गोड –गोजिरी शुभ्र –पांढरी जाई जुई उमलते,
या वर्षा ऋतूत कोकीळ पावसाचे गाणे गाते.
कधी रिमझिम कधी मुसळधार बरसती श्रावणधारा,
हिरव्या हिरव्या. वनराईने आज नटली वसुंधरा.
पांढरी झालर काढून निळी पांघरली नभाणी,
इंद्रधनुत भरले रंग प्रकाश आणि पाऊस थेंबानी .
होते पेरणी तूर, बाजरी आणि भाताची,
नाचतो रानी मयूर गाणी गात पावसाची.
कष्टकरी होतो दंग, गात विठूचे अभंग,
ऋतू बदलतो सर्व रंग, मन होते जणू तरंग.
सण येतो पंचमीचा आणि नारळी पौर्णिमेचा,
हर्ष दाटलेला उरी पण डोळा पानावतो बहिणीचा.
डोळे पुसले भावाने म्हणे काय हवे तुला,
बहिण बोले भावाला रक्षेचे वचन दे मला रक्षेचे वचन दे मला…..