मुखवटे आणि मौन वेदना -ऐक क्रांतिकारी कविता
मी रिकामटेकडा आरोप आहे माझ्यावर खास
शरीर स्थिर मन ही स्थिर आहे म्हणुनी ना उदास
तुम्ही कामधाम करून ही आहात इंद्रियाचे दास
तुमचे शरीर नि मन ही अस्थिर तरी व्यर्थ प्रयास ||1
उजळलेत मुखवटे आता लोक प्रदर्शना साठी
पण सत्य हे कि लपवलेत अंतरीचे भाव जगण्यासाठी
दमडी नाही खिशात पण अविर्भाव कोट्याधीशाचा
तत्वज्ञान शून्य जगणे जगत आहे बाजार मूर्खपणाचा ||2
शिकले सवरले ज्ञानी म्हणवतात समजूनही अडेलमा णा
इंग्रज गेलेत तरी अजून बाळगून आहेत गुलामीचा बाणा
भाकरीचा तुकडा मिळाला नाही म्हणून भुंकतात कुत्रे
लाच लुचपत व दलाली मिळेल कुठे म्हणून हुंगतात डुकरे ||3
सज्जन समाजात कोणी थोडेच आहेत बाकी सारे माकडे
स्वार्थासाठी दावणीला बांधलेत मंदिर धर्मशाळा बाप रे!!!!
स्वार्थासाठी रामाच्या भेशांत लपलेले आहेत रावण इथे
डल्ला मारण्यासाठी टपून बसले आहेत सोंगाडे जिथे तिथे||4
12/6/25-बार्शी
गझल
मी रिकामटेकडा आरोप आहे माझ्यावर खास,
शरीर स्थिर, मन ही स्थिर – कसा मी होऊ उदास?
तुम्ही कामधंद्यात गुंतले, इंद्रियांचे दास,
तरी पोकळ प्रयत्न करता, शांततेचा नुसता भास।|1||
उजळले मुखवटे आता, लोक उभे प्रदर्शनात।
भाव लपवुनी ठेवती, सत्य हरवले जीवनात॥
खिशात नाही दमडीही, थाट मोठा श्रीमंतीचा।
मुखात राम नाम, मार्ग धरतो मूर्खपणाचा ||2||
शिकले-सवरले ज्ञानी म्हणवती, तरी अडेलमाणा।
इंग्रज गेले, उरला का हा गुलामीचा बाणा?
भुंकती कुत्र्यासम येथे, भुकेला जो होतो गामा,
लाचेत हुंगती ते लोक, नेसती डुकराचा जामा॥3||
सज्जन समाजात थोडे, बाकी सारे माकडचाळे
धर्मशाळा बांधून ठेवल्या, स्वार्थासाठी बापा रे बापा रे॥
रामनामाचा व्यापार केला, रावण उभा दिसे द्वारे
पवित्रतेचं सोंग रचून, टपतात आता सारे सारे॥4||
12/6/2025बार्शी पहाटे 3:00
अजय चाकवते