✍️✍️ओढ✍️✍️
✍️✍️ओढ✍️✍️
…………………………………………….//
पुन्हा श्रावणात
भिजल्या आठवणी
गर्द हिरवळीची
हुरहुरली वाट देखणी
डोळ्यात भरून
आल्या सरी,
गहिवर मनी
ऋतुंची करावी मनधरणी…
चिंब पावसाला
एकच विनवणी
माझ्या गावा बरसुन जा…
करुन एकांत
जिवाची पाठवणी…!
…………………………………………….//
✍️”अशांत”शेखर✍️
21/06/2022