✍️मोहसुख✍️
✍️मोहसुख✍️
………………………………………………//
उघड्या डोळ्यांनी
आभाळालाच स्वप्न मागावे
हात गगनाकड़े उंचावताना
थोडे आपले बळ तोलुन घ्यावे
प्रगतीचे प्रशस्त मार्ग
क्षितिजाकडे मुक्त अंथरावे
पल्याड वाटा ओलांडताना
जरा दुरचे अंतर मोजुन घ्यावे
हृदयाच्या अंतरित
अथांग समुद्राचे प्रेम साठवावे
मात्र इतरांसाठी उधळतांना
थोडे स्वतःसाठी ही जपुन घ्यावे
आपल्याच वाट्याचे
आयुष्याकडे मोहसुख अपेक्षावे
रस्त्यातील बोचरी काटे तुडवतांना
वेदनेला ही अलगद सोसुन घ्यावे
………………………………………………//
✍️”अशांत”शेखर✍️
20/06/2022