.✍️साथीला तूच हवे✍️
✍️साथीला तूच हवे✍️
————————//
जसे…!
परतीच्या
सांझेला
पाखरांचे थवे ।
डोळ्यांच्या
वाटेला स्वप्न
उमेदीचे नवे ।।
क्षितिजा
पल्याड खोल
गर्भाचा अंधार
मावळेना ।
वाटते…!
निराशेच्या दारात
एकदा
प्रकाश दिव्यांना
उजळून घ्यावे।।
डोहाळले
मन परतीला ।
पुन्हा
पावलांच्या
साथीला तूच हवे ।।
—————————–//
✍️”अशांत”शेखर✍️
07/06/2022