प्रयत्न……
बांधून ठेवलेल्या
हाता पायांना
कसली आली मुभा
हलचल करण्याची
आणि ठणठणीत गळा
असतांनाही बंधनांनी
शिवलेल्या ओठांना
नाहीच परवानगी
काही बोलण्याची
आणि व्यक्त होण्याची
म्हणूनच की काय
तो आक्रोश आता
फुटू पाहतोय
एक विक्राळ रूप घेऊन
आतल्या आत एखाद्या
बॉम्बस्फोटागत
आणि संपवू पाहतोय
त्या कमकुवत जिंदगीला
हतबलतेने निराशेने
एक पर्याय म्हणून
शेवटचा
——–//–
शशिकांत शांडिले (एकांत), नागपुर
मो.९९७५९९५४५०