✍️दो और दो पाँच✍️
✍️दो और दो पाँच✍️
——————————————————————//
पोटाच्या आगेच मुळं मी भूखेत शोधलं पण मला सापडेना.खर्र पाहता माणसांच्या भूखेच अचूक रहस्य कुणालाही कळलेल नसावे,मुळात पोटाला भूखेची आग नसतेच! माणसांच्या भूखेची खरी आगं तर वैश्विक जगाच्या प्रगती मधे आपले अस्तित्व शोधन्याची असते..!इथे गरीबांच्या गरीब भूखेचा विषय कधीच कुणाच्या अंतर्मनाला शिवुन जात नसतो तो इथल्या राजकारणाचा व राजकारभारांचा आवडता विषय असतो.
माझ्या प्रगतीचा आलेख उभा झालाय शालेय परिक्षेच्या निकालात. मराठीतली इंच इंच प्रगती इंग्रजीत उंच उंच कधी व कशी जाणार याचा सातत्याने विचार मेंदूत कोंदत असायचा.मागासलेल्या आदिवासी गांव खेड्यातून शहराच्या अर्ध्या इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला मग प्रगती पण अर्धवटचं…! इयत्ता आठवित अचानक आयुष्याचे बिजगणित अलजेब्रा झाले,अन भूमिती भविष्याची जॉमेट्री झाली,जीवशास्त्र टांगनीला आला व बायोलॉजी झाला, जीवनातल्या भौतिकशास्त्रा च्या गरजा फिजिक्स मधे बदलल्या आणि जगण्याच्या रसायनशास्त्राची केमिस्ट्री कधी मला जमलीच नाही.
बापाच्या प्रत्येक दोन तीन वर्ष्यात होणाऱ्या बदल्या त्या माझ्या शालेय प्रगतीला स्थिरावु देत नव्हत्या. प्रत्येकदा नवीन शाळेची ईमारत नवीन शिक्षक, नवीन विद्यार्थी मित्र कमी चिडवनारी उनाड मूले जास्तच, एका डोळ्याच्या अधुपणामुळे फारशी मित्रांची जवळीक निर्माण व्हायची नाही, खुप विचित्र असायचे अनुभव..! प्रत्येक गांव शहरात आंधळ्याना वेगवेगळ्या उपहासात्मक उपमा असायच्या कुणी भोकन्या तर कुणी घोल्या कुणी डिमलाइट हि बोलायचा तेव्हा माझ काळीज तीळ तीळ तुटायच आणि मेंदुचा ताप पाऱ्याला हि मोजता न येणारा…! नसता संताप..!इथे कोवळ्या वयातच माझे मानसिक खच्चिकरण होत गेले.
एकाकी नवीन गांव शहरात प्रवेश झाला की अनवानी पायाने रस्ते पालते घालून शाळा शोधायची हि तारेवरची कसरत असायची एवढ्या बालवयात हे लीलया कार्य कसे पेलायचो हे आज मात्र विचार करून ही उमजत नाही हो..! ना फोन ,ना मोबाइल, ना रस्ते, ना वाहतुक माझ्या जवळ नाही हो गावात. एक मात्र आज कळलं बालवयातल्या मुलांच्या प्रगतीचे मानसशास्त्र काय असते,मुलांची प्रगती त्याला मिळणाऱ्या सकारात्मक पोषक वातावरणामुळे होत असते प्रत्येकदा बदलणाऱ्या शाळा इमारती शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोबत समरस होता येईलच असे नाही.हे फार अवघड असते बालवयात.
मुलांमुलींनी जमेल तेवढे नको, हमखास एकाच दिशेला लक्षकेंद्रित करण्याची किमया आत्मसात करावी,माझ्या वाट्याला हा शालेय प्रगतीच्या मानसशास्त्राचा विषय कधी आलाच नाही..! मात्र हे मला कळून चुकले कि वैश्विक जगाच्या प्रगती मधे माणसांना आपले स्थान बळकट करण्याचे बिंजाकुर इथुनच अंकुरतात आणि ते वटवृक्षा सारखे दुर दुर पसरतात अगदी साता समुद्रापार आणि इथेच “दो और दो पांच” चे बिजगणित तयार होत असते कुठल्याही गणितीय पद्धती मध्ये न बसणारे. पोटाच्या आगेचं मुळ भूखेत नसते तर ते असते प्रगतीच्या भुखेत..! इंच इंच प्रगती..!उंच उंच प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी..!ती धडपड असते केवळ अस्तित्वाच्या प्रगतीसाठी… “दो और दो पांच” करण्यासाठी….
——————————————————————//क्रमशः
✍️”अशांत”शेखर✍️
12/05/2022