✍️घुसमट✍️
✍️घुसमट✍️
———————–//
नदीचा तो काठ
आज मनात डोहाळला
अन आसवांचा पुर
लोचनात भरून आला..!
तुझ्या भेटीस
हा जिव कसा अधिरला
बघ हुंदक्याना ही
श्वास किती जड झाला..!
ह्या वेदनेचा सुखाशी
उगीचचं असतो अबोला..!
घुसमट अंतर्मनाची
सांगावी कशी कुणाला..?
———————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
08/06/2022