गझल पहिली
मोह राग पेटताच,दुःख फार जाहले,
ज्ञान सूर्य भेटताच,कर्म दूर जाहले ||
बाळ आज चाल तूज, संग सोबती दिले.
सूर्य चंद्र साथ होय, नृत्य आज रंगले ||
ज्ञान बीज पेरताच, सौम्य भाव जोपले,
सौख्य लाभले मलाच, जीवनी आनंदले ||
पंच तत्व पाळताच, दया फुल डोलले,
शौर्यवाण होउनीच, राष्ट्रगीत गायले ||
भेदभाव सोड प्रेम, गीत गात चालले,
मानवात माणसेच, ”अजेय”वीर शोभले ||