क्रिकेट आणि जीवन!
जीवन जगणं खूप सोपं असतं,
क्रिकेट च्या मैदानावर जस टॉस असतं..!
कधीतरी आऊट व्ह्यायच असतं,
नि कधीतरी शतक करायचं स्वप्न पहायचं असतं..!
नशिबाला नो बॉल वर फ्री हिट समझायच असतं,
काहीतरी करून दाखवायचं असेल तर मैदानावर उतरायचं असतं..!
मेहनत व चिकाटी ने जीवनात सिक्स फोर मारायचं असतं,
फक्त बॉलिंग आणि बॅटिंग ने सगळं जमत नसतं,
तर आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी रन काढायचं असतं!
हरलो म्हणून मागे वळायचं नसतं,
जिंकण्याच्या स्वप्ना बरोबर पुढे जायचं असतं!!