एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे. ज्याला आपल्या मनातले सर्व
एकदा तरी आयुष्यात कोणी असे भेटावे. ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे.
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सारून जावे.
आणि साऱ्यतानही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे
त्याला घेऊन सोबतीने खूप चालावे. चालता चालता दूरवर खूप थकावे, पण थकल्यावरही आधारासाठी त्याच्याकडे पहावे. पाहताना डोळ्यात सगळे जग दिसावे.
दुःख त्याचे असावे आणि अश्रू माझे असावे. सोबतीने त्याच्या तेही टेगणे वाटावे.
आनंदात त्याच्या हसू माज असावे. त्याच्या आनंदात सर जग दिसावे.
एकदा तरी आयुष्यात कोणी तरी अस भेटावे
ऊन्हात त्याची सावली तर पावसात थेंब व्हावे
गालावरच्या हसू च कारण त्याच असावं, डोळ्यातल्या पाणी त्याच्या विरहच कारण असावं…….