कविता
अमिट गोड,
वचन जिनवाणीचे_
तृप्त ढेकर||1||
मिटे अंधार
प्रकाश जिनवाणीचा_
रस्ता सरळ||2||
सुखी जीवन,
साथ जिनवाणीची _
हात देऊन ||3||
मिळे विवेक,
देशना जिनवाणी _
ग्रहण करा ||4||
आगम चक्षु
आचरण करतो _
नित्यची साधू ||5||
हिताहिताची,
होते ओळख जीवा _
प्रकाश दिव्य ||6||
सर्वांगी खिरे
तीर्थकरांची वाणी _
हितेशी नित्य ||7||
उद्धारी जीवा,
आप्त वचन सत्य _
प्रत्यक्ष जाण ||8||
मिथ्या अंधार,
जिनवाणी प्रकाश _
दूर करितो ||9||
मिटे भ्रमण
औषधं जिनवाणी _
प्राशन करा ||10||
कषाय विष,
मंत्र जिनवाणीचा _
उतरविते ||11||
बलिष्ट आत्मा,
औषधी रसायन _
जिनावणीचे ||12||
मुक्ती दायक,
दुःख निवारक ती _
आगम वाणी ||13||
स्वर्ग मोक्षाला,
पाठवी जिनवाणी _
अंगीकारुनी ||14||
वस्तु स्वरूपा,
बोध देती सुज्ञानी_
आगम वाणी ||15||
लोक अलोक,
निरूपक आगम _
प्रत्यक्ष दर्शी ||16||
आनंद दायी,
जिनवाणीचा योग _
करा प्रयोग ||17||