बापचं निस्वार्थ प्रेम
लहानपणी मला वाटायचं, माझ्या पप्पांच्या खिशात काहीतरी जादू असते.
कधी चॉकलेट, कधी फुगा, कधी माझ्यासाठी लहानशी खेळणी…
मला जे हवं ते पप्पा नेहमी आणायचे.
त्या वेळी मला कळत नव्हतं —
की पप्पांच्या त्या खिशात “जादू” नव्हती…
त्या खिशात स्वप्नं होती — माझ्या स्वप्नांची.
माझ्यासाठी पाऊस आला तरी पप्पा भिजायचे,
थंडी आली तरी पप्पांच्या शर्टवरची बटणं तुटेपर्यंत तेच कपडे घालायचे.
माझा शाळेचा डबा भरलेला असावा म्हणून
पप्पा स्वतःचा डबा रिकामाच ठेवायचे.
एक दिवस मी बघितलं—
पप्पा रात्री उशिरापर्यंत काम करत होते,
त्यांचे हात थरथरत होते,
डोळे लाल झाले होते.
मी विचारलं, “पप्पा, एवढं काम का करता?”
ते फक्त हसले आणि म्हणाले,
“तुला काही कमी पडू नये म्हणून.”
त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं—
पप्पा सुपरहिरो नसतात,
ते सुपर sacrifices करणारे साधे माणसं असतात.
हात थकलेले असतात,
खिसे रिकामे असतात,
पण मन नेहमी माझ्यासाठी भरलेलं असतं.
आज मी मोठी झालेय…
पण अजूनही मला वाटतं—
पप्पांचे पाय माझ्यासाठीच धावले,
पप्पांचे हात माझ्यासाठीच कामले,
आणि पप्पांचे हसू माझ्यासाठीच चमकले.
जर कधी देव मला विचारेल—
“तुला आयुष्यातलं सर्वात मोठं gift कोणतं?”
तर मी डोळ्यांत पाणी घेऊन एकच सांगेल—
“माझे पप्पा… कारण त्यांनी मला आज मी आहे ते बनवलं.”
पप्पा, तुमच्यासाठी माझ्याकडून एकच शब्द—
धन्यवाद नाही…
कारण ते खूप छोटं आहे…
तुम्ही माझ्यासाठी जे केलंत,
ते कधी शब्दात मावतच नाही.