Sahityapedia
Sign in
Home
Your Posts
QuoteWriter
Account
1 Jun 2022 · 1 min read

✍️कधी कधी✍️

✍️कधी कधी✍️
——————————-//
कधी कधी सुखाच्या
ओंजळीने दुःख वेचुन घ्यावे
कधी कधी दुःखाचे
पांघरून आनंदाने ओढून घ्यावे

कधी कधी क्लिष्ट नात्यांना
अलगद जपुन घ्यावे
कधी कधी जपलेल्या नात्यांना
एकदा पारखुन घ्यावे

कधी कधी मनातले
घट्ट मौन सैल करुन घ्यावे
कधी कधी मुक्तपणे
शब्दांनाही उधळुन घ्यावे

कधी कधी वेदनेलाही
उराशी गोंजारून घ्यावे
कधी कधी उसवलेल्या
जखमांचे घाव शिवुन घ्यावे

कधी कधी बुरसटलेले
दृष्टिकोन बदलून घ्यावे
कधी कधी निराशेच्या
धुळीला झटकुन घ्यावे

कधी कधी गुंतागुंतीचे
धागे सहज सोडवून घ्यावे
कधी कधी जगण्यातले
कठिन मर्म जाणून घ्यावे

कधी कधी माझ्यात तू
तुझ्यात मी सामावून जावे
कधी कधी माझ्या आसवांनी
तुझ्या डोळ्यातून वाहून जावे
————————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
28/05/2022

Loading...