✍️”बा” ची व्यथा✍️।
✍️”बा” ची व्यथा✍️।
…………………………………………………//
अरे चिमन पाखरांनो
आधाराचे घरटे सोडू नका
उभे केले मी कष्टाने
विश्वासाची फांदी तोडू नका
तुम्हा भूखेल्यांना चारा भरवित आलो
साऱ्या तहानल्यांची पाणी होवुन भागलो
अबोल मुक्यांची हाक होवुन जागलो
आस माझ्या या हाकेची मोडू नका
अरे चिमन पाखरांनो
आधाराचे घरटे सोडू नका
काटेरी तरुला भीड़त ही गेलो
पंखात असह्य वेदना भोगीत आलो
तरी तृण सावलीचे चोचिने उचलित आलो
या सावलीला बेईमान होवु नका
अरे चिमन पाखरांनो
आधाराचे घरटे सोडू नका
लख्ख प्रकाशाचे द्वार उभे हे केले
तुम्हा पंखांना सामर्थ्याचे बळ मी दिले
गर्द काळोखाला बाहेर मी खेचले
या अंधाराचे वारस तुम्ही होवु नका
अरे चिमन पाखरांनो
आधाराचे घरटे सोडू नका
………………………………………………………//
✍️”अशांत”शेखर✍️
02/07/2022