✍️स्टेचू✍️
✍️स्टेचू✍️
———————————//
स्टेचू म्हणावे कुणी तरी
आणि सारे क्षण निस्तब्ध व्हावे
वेळ घड्याळात स्थिरावुन जावा
काळ घटिका निपचित व्हाव्या
अचानक आयुष्याच्या
वाटेत गतिरोधक यावा
आणि आपले विस्तीर्ण जग
स्टेचू व्हावे तसा मी…
एका शून्य परिघात उभा …
अविचल गतिहीन
दगडातल्या पुतळ्यासारखा…
निदान दगडातल्या
पुतळ्यांसाठी काही ठराविक
श्रद्धेचे क्षण तरी येतात
कुणाच्या उपासेनेचा
वेळ तरी त्यांना मिळतो
आणि त्यांच्यासाठी काही काळ
आनंद उत्सवांचा हि ठरतो…
दगडांनी सुद्धा दैवत्व मिळवले
सृष्टीतल्या पामरांकडून…!
स्टेचू माणसांनी कधी बनु नये
हो तो दगडासारखा
उभा राहिला कि
अगतिक सजीवातला
तो निर्जीव भासतो…
स्टेचू बनून माणसाने
आपले स्वातंत्र्य हिरावू नये…!
कुणी तरी स्टॉप म्हणावे
याची वाट बघत
कुणाचीही गुलामी स्विकारु नये…!
—————————————————//
✍️”अशांत”शेखर✍️
20/05/2022