.✍️स्काई इज लिमिटच्या संकल्पना✍️
✍️स्काई इज लिमिटच्या संकल्पना✍️
——————————————————–//
अर्थासाठी अनर्थ घडतो…!
अर्थाच अर्थकारण समजुन घ्यावं
यानंतरच…
एक एक पाऊल सावध पुढे जावं…!
तेव्हा..!मी पण सकारात्मक दृष्टिकोन
आत्मसात करू लागलो…
अन जिंदगीच्या खड़तर प्रवासवाटेवर
अड़खडत चालु लागलो…
मग कुणीतरी सुटाबूटातला
स्काई इज लिमिटच्या
मिळकतीचे मांडू लागतो समीकरण…
एक और एक दो..नही ग्यारह होते है…!
तो करू लागतो अंकगणिताचे ध्रुवीकरण…
अर्थार्जनासाठी आपण हि आपल्या
भविष्याचे रोडमैप तयार करू लागतो…!
मग दैनंदिन विकासाचा
प्रेरणादायी एक रोलमॉडल हि निवडतो…!
विश्वातल्या संपूर्ण मोटिवेटर चे कोट्स घराच्या
भिंतीवर आपण सजवून घेतो
प्रेरक जगधनिकांच्या अर्थाचं अर्थपुराण कथन करतो
पंचतारांकित जीवनशैलीच्या अर्थाचं समर्थन करतो
त्या अर्थाच्या नियोजनात आपले ही वर्तन बदलवतो
मग कल्पनेच ते विलासी जग आपणाला खुणावतात
नकळत मनाचे आभासी पंख आकाशाकडे झेपावतात
जगाचे वैभवं मिळविण्याची तिव्र इच्छा अस्वस्थ करते
हृदयाच्या प्रत्येक कप्याकप्याला…
कधी न ऐकलेल्या कार मॉडल आपण
गूगल वर सर्च करू लागतो
जगातले डेस्टिनेशन टूरिस्ट लोकेशन शोधु लागतो
मेंदू ही निकामी स्वस्थ बसत नसतो….
अगदी अशांत..अस्थिर..नसती घालमेल काळजाची
जिवाला एक अधीर मृगतृष्णा असते
भूख…
तहान…
झोप…
याची कुठलीच काय पर्वा नसते निर्भिक शरीराला!
आणि…! आणि…!
मान…
सन्मान…
आत्मसन्मान…
कशाचीच काय मुळीच नसते तमा अन्तःकरणाला !
माझेच सत्य.. हि माझीच अनुभूती..
आपल्या छटाक जिंदगीचे
अर्थकारण एकदा नीट समजुन घ्यावे…
जगण्याच्या कला किमयेचे
साधे साधे संदर्भ असतात
एकदा सरळ सरळ नीट तपासून घ्यावे…
खर्र सांगतो मित्रा…!
अर्थासाठीच अनर्थ घडतो…!
अर्थाच अर्थकारण समजुन घ्यावं
यानंतरच…
एक एक पाऊल सावध पुढे जावं…!
———————————————————//
✍️”अशांत”शेखर✍️
10/05/2022