✍️सूर्यज्वाळा✍️
✍️सूर्यज्वाळा✍️
———————–//
हळुवार
उतरून आल्या
तिच्या रिक्त
मनात वेदना,
व्यथा बनुन
चंद्राला
बोलु लागल्या,
निरभ्र आकाश
दाटून आले
घन तमा सवे,
शुभ्र चांदणे
कालवंडले
पौर्णिमेच्या रात्री
कधी रात्र
उलटली
तिला कळलेच
नाही,
जणू चंद्राने
दिलासा दयावा
नव्या सूर्योदयचा,
माथ्यावर
लेवुन याव्या
सूर्यज्वाळा
निर्धाराच्या,
वेदनेला
ठणकावून
सांगू लागल्या
आता रात्र
नको व्यथेची…!
पुन्हा पुन्हा
त्याच कथेची…!
—————————//
✍️”अशांत”शेखर✍️
09/06/2022