✍️मी परत शुन्य होणार नाही..!✍️
✍️मी परत शुन्य होणार नाही..!✍️
————————————-//
तो म्हणाला
पप्पा!, पुन्हा एकदा
होवून जा शून्य…!
अधांतरी भवितव्य
पूर्णत्वास नेण्यासाठी
केलेले कर्म तुम्ही
करुन घ्या मान्य…!
जणू एक तपाच्या
गडद अंधारनिद्रेत
निद्रिस्त निपचीत मी…
खाडकन जागा झालो..!
माझी इभ्रत.. ईमान…
अभिमान.. स्वाभिमान..
सारचं काही शरीरासवे
मी चिंधडया चिंधडया झालो..!
कळेना असा कसा
ओढून मरगड निराशेची…
शून्यातच शोधतो आहे स्वतःला…
अरे..! शून्यातूनच तर
सोडवले होते आयुष्याचे गणित मी
प्रत्येक अंकावर
एक एक शून्यच मांडायची
पैज होती ना…!
बाळा..! जिंकता जिंकता हरलो मी
आणि पुन्हा शून्यातच येवून पडलो मी
हरकत नाही…!
तू सूचविल्याप्रमाणे
पुन्हा शून्यातूनच उभे होवु
आणि आपल्या आयुष्याच्या
अंकगणितातुन शून्याला अशा
संख्येतुन वजा करू की त्याचे उत्तर
परत शुन्य येणार नाही..!
मी परत शुन्य होणार नाही..!
———————————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
10/05/2022