भावना
अक्षराशी खेळता खेळता,
कविता माझी झाली.
शीघ्रकोपिंच्या साहवासात,
क्षमा मला मिळाली.
गर्विष्ठाच्या महालत,
नम्रता मिठीत आली.
क्रूर पाराद्या च्या कळापत,
दया घरात माझ्या आली.
ऋक्ष समाजात राहून,
स्निग्धा अंतरी निमाली.
विषमतेच्या बाजारात,
समतेने बाजी मारली.
भित्र्या माणसात मला,
शौर्ये ने स्फूर्ती दिली.
पाखंड्याच्या मेळ्यात,
खरी श्रद्धा, आस्था, दृढ झाली.
भक्तीच्या साथीनेच,
परमेश्वरी प्रसन्न झाली.
या विषम परिस्थितीत,
आस्था माझी बोलू लागली.
प्रसिद्धीची आशा मला नाही,
पण सिद्धी मला प्राप्त व्हावी.
अशांत या जगता मध्ये,
शांती सर्वत्र नांदावी.
संसाराच्या स्वरूपा मुळे,
मुक्तेची ओढ मला लागली…©