✍️दिव्याची महत्ती…!✍️
✍️दिव्याची महत्ती…!✍️
———————————————–//
सृष्टिने आपले रहस्य उलगडले
सूर्यानेच अंधाराला जाळले…
आणि तो प्रकाशाचा निर्मिक ठरला…
मग इतिहासने मौन सोडले
बिनधास्त सत्य सांगु लागला..!
मिणमिणत्या दिव्यांचे
ऐहिक कर्म महान,तो बोलु लागला..!
दिव्यांनी सुर्यापेक्षा
स्वतःला कमी लेखु नये…!
त्यांच्या इवल्याश्या उजेडातूनच
संबंध मानवतेला प्रकाशमय
करणारा महासूर्य तेजाळला…!
आणि निर्माण केली
हजारो शतकांची विचारऊर्जा
मानवाच्या पोषक प्रगतीला तारक ठरणारी
मनुच्या शोषक व्यवस्थेला मारक ठरणारी
सोडुन गेला तो मानवी मूल्यांचा खजिना
भविष्यात कधी ही न संपणारा..!
तो क्रांतिप्रवाह धमन्यातुन वाहतो
भविष्यात कधी ही न थांबणारा..!
—————————————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
10/05/2022