कविता -भोग
संचिताचा भोग संपणार कधी,
उद्या चा आनंदी सूर्य दिसणार कधी ||
भोग आणखी हि किती बाकी आहे,
अंतिमश्वासा पर्यंत का तो साथीआहे ||
जरि जगण्याची उर्मी बाकी आहे,
जगण्यासाठी समतेची युक्ती नामी आहे ||
कषयांच्या उठल्या सुनामी जरि
सोसण्या ते घाव तु बनावे सुज्ञानी तरि ||