✍️कथासत्य✍️
✍️कथासत्य✍️
—————————————-//
कोवळं बालवय
आजीच्या कथा विश्वात
कसं मंथरुण चेटुक व्हायच
भोपळा टूणुक टूणुक चालायचा
कोंबळयाच्या कानात
अख्ख जग सामाहुन जायच..
लांडगा आल्याची भीती वाटायची
कोल्हाला द्राक्षे मिळाली नाही कि
त्याला ती आंबट लागायची
सिंहाला उंदीर मदत करायचा
अस्वल मात्र संकटात सोडुन जाणाऱ्या
मित्रापासुन सावध करायचा
अशा एक ना अनेक कथा
काही तरी प्रेरणा देवून जायच्या…
आता मी मोठा झालो
कथेपासुन लांबच लांब गेलो..
वास्तव्याशी समरस झालो..!
जीवनाच्या प्रश्नाचे नीट उत्तर सोडवता
आले नाही तर आयुष्य भोपळा होते..
आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी
माणस कोबंळया सारखे जिद्दीला पेटतात..
हल्ली माणसात भोगविलासी
लांडग्याची वृत्ती दिसुन येते..
एकमेकांना मागे खेचण्याच्या स्पर्धेत
कोल्ह्यासारखे धूर्त डाव खेळतात माणसे..!
उंदीरा सारखी जोखिम पत्करण्याचे
साहस आता कुणी माणसे करीत नाही…
शेवटी अस्वलाने कानात
सांगीतलेल कुणी ऐकलच नाही आणि
माणूस अनेक संकटात सापडत गेला…
हे कथासत्य
जीवनमर्म सांगून जातात
आयुष्याच्या वास्तव्याशी
अलगद एक धागा जोडून जातात..!
ह्या कथाविश्वाचे आपण हि
एक पात्र आहोत हे सांगून जातात..!
————————————————-//
✍️”अशांत”शेखर✍️
19/05/2022